Saamana : …तेच बिहारमध्ये झालं, निकाल धक्कादायक नाही, निवडणूक आयोग जिंदाबाद, ‘सामना’तून खोचक निशाणा

Saamana : …तेच बिहारमध्ये झालं, निकाल धक्कादायक नाही, निवडणूक आयोग जिंदाबाद, ‘सामना’तून खोचक निशाणा

| Updated on: Nov 15, 2025 | 11:30 AM

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर टीका करण्यात आली आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. बिहारचे निकाल धक्कादायक नसल्याचे सामनाने म्हटले आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घालून काम करत असल्याचे दिसते, असा आरोप सामनातून करण्यात आला. महाराष्ट्रात घडवून आणले, तेच बिहारमध्ये झाले असेही सामनाच्या अग्रलेखात नमूद आहे. तेजस्वी यादव यांच्या पराभवासाठी पंतप्रधान आणि पाच राज्यांचे मुख्यमंत्री बिहारमध्ये गेले होते, अशीही टीका सामनाने केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठे बहुमत मिळवले असून, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मात्र, या विजयानंतर आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून सस्पेन्स वाढला आहे. जनता दल युनायटेडने (जेडीयू) मुख्यमंत्रीपदावर दावा केला असला तरी, भारतीय जनता पार्टी (भाजप) राज्यात पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

Published on: Nov 15, 2025 11:30 AM