तर मी रायगडावर राजसदर बांधतो, किल्ले रायगडावरून संभाजीराजे कडाडले

तर मी रायगडावर राजसदर बांधतो, किल्ले रायगडावरून संभाजीराजे कडाडले

| Updated on: Jun 06, 2025 | 12:43 PM

Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला. यावेळी संभाजीराजे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सरकारला शक्य नसेल तर मी रायगडावर राजसदर बांधतो, असं संभाजीराजे छत्रपती यांनी आज रायगडावरून बोलताना म्हंटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 352 वा राज्याभिषेक सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड येथे विविध कऱ्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी राज्याभिषेक सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती देखील उपस्थित होते. राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना हे मोठं विधान केलं आहे.

यावेळी पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, हा शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा असून सुवर्णक्षण आहे. माझी जबाबदारी आहे की जे रायगडला पोषक आहे त्याच गोष्टी येथे राहणार आणि हा माझा शब्द आहे. अतिक्रमण काढत असताना माझं संरक्षण सुद्धा येथील धनगर समाजासाठी असणार आहे. ज्या ठिकाणी हजार दोन हजार लोक यायचे तिथं आज लाखो लोक येतात. एवढा शिस्तबद्ध शिवभक्त. कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. मला आयजी आणि एसपीने विचारलं की शिस्त कशी निर्माण होते. हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत, असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

Published on: Jun 06, 2025 12:43 PM