Sambhajinagar News : अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरण; सीआयडीकडून तपासाला सुरुवात

Sambhajinagar News : अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरण; सीआयडीकडून तपासाला सुरुवात

| Updated on: May 28, 2025 | 2:55 PM

Sambhajinagar Amol Khotkar Encounter : संभाजीनगर येथील दरोडा प्रकरणातील आरोपी अमोल खोतकरच्या एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू करण्यात आला आहे. एन्काउंटर झालेल्या ठिकाणी सीआयडीकडून तपास केला जात आहे. संभाजीनगरच्या उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्या अमोल खोतकर याचा एन्काउंटर काल पोलिसांकडून करण्यात आला होता.

संभाजीनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी सर्वात मोठा दरोडा टाकण्यात आलेला होता. या दरोदयाने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी फरार होते. त्यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली होती. तर मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा शोध पोलीस घेत होते. काल खोतकर याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत असताना खोतकर याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आता या संपूर्ण एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे.

Published on: May 28, 2025 02:53 PM