“सरकार कुठलंही येऊ द्या मात्र..”, शिवसेनेच्या बंडाळीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“सरकार कुठलंही येऊ द्या मात्र..”, शिवसेनेच्या बंडाळीवर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 3:37 PM

ज्या कोणाचे सरकार येईल, त्याने सामान्य माणसांचे प्रश्न सोडवावेत, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

ज्या कोणाचे सरकार येईल, त्याने सामान्य माणसांचे प्रश्न सोडवावेत, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. शिवसेनेच्या बंडाळीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, मला त्यात काही बोलायचं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की, सरकार कुठलंही असो सामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य द्यावं.” गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्याच पक्षाविरोधात बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं आहे. यावर संभाजीराजे म्हणाले, ज्या कोणाचे राज्यात सरकार येईल, त्यांनी सामान्य माणसाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवावे.