Samruddhi Highway : भलंमोठं भगदाड… याला समृद्धी महामार्ग म्हणायचं की… बघा व्हिडीओ

Samruddhi Highway : भलंमोठं भगदाड… याला समृद्धी महामार्ग म्हणायचं की… बघा व्हिडीओ

| Updated on: Jul 16, 2024 | 4:18 PM

समृध्दी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ मागील पंधरा दिवसांपासून मोठे भगदाड पडले असून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हे मोठे भगदाड पडलेल्याचे समोर आले आहे. प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.

गेल्या मागच्या आठवड्यात समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनविलेल्या ब्रीजला मोठं भगदाड पडल्याचे समोर आले होते. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे – बावघर – शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेल्या ब्रिजला मोठं भगदाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे समृद्धी महामार्गावर केलेली निकृष्ट दर्जाचे कामाचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला होता. अशातच समृध्दी महामार्गावर सिंदखेडराजा जवळ मागील पंधरा दिवसांपासून मोठे भगदाड पडले असून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हे मोठे भगदाड पडलेल्याचे समोर आले आहे. तर या दोन लेन वाहतुकीसाठी बंद आहेत. मात्र अद्यापही प्रशासन हे भगदाड बुजविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.

Published on: Jul 16, 2024 04:13 PM