Sandipan Bhumre : दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका

Sandipan Bhumre : दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका

| Updated on: Apr 13, 2025 | 5:38 PM

Sandipan Bhumre On Chandrakant Khaire : संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भूमरे यांनी आज चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे.

चंद्रकात खैरे यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावीत, असं संदीपान भूमरे यांनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे हे कागदोपत्री नेता असल्याची टीका देखील यावेळी भूमरे यांनी केली आहे. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी आता संभाजीनगर जिल्ह्याची वाट लावली असल्याचं सुद्धा संदीपान भूमरेंनी म्हंटलं आहे. अंबादास दानवे यांनी स्वत: केलेलं काम दाखवावं असं म्हणत संदीपान भूमरे यांनी दानवे आणि खैरे यांच्यावर हा निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना भूमरे म्हणाले की, खैरे यांना आता कोणी विचारत नाही. ते स्वत:च म्हणतात माझं कोणी ऐकत नाही. मग आता चंद्रकांत खैरे यांना काय महत्व द्यायचं? कोण खैरे? त्या खैरेला कोण विचारतं? त्यांनी आता घरी बसून नातवंड सांभाळावे, अशी टिका भूमरे यांनी यावेळी केली आहे.

Published on: Apr 13, 2025 05:32 PM