५०० एकरांचं मैदान अन् ५ लाख बैलगाडा प्रेमी! श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला

५०० एकरांचं मैदान अन् ५ लाख बैलगाडा प्रेमी! श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला

| Updated on: Nov 09, 2025 | 5:00 PM

सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. ५०० एकरांच्या मैदानावर ५ लाखांहून अधिक बैलगाडा प्रेमी दाखल झाले आहेत. दोन फॉर्च्युनर, थार गाड्यांसह मोठी बक्षिसे असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. हे राज्यातील पहिले बैलगाडा शर्यत अधिवेशनही आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचा भव्य थरार सुरू झाला आहे. ५०० एकरांच्या मैदानावर ५ लाखांहून अधिक बैलगाडा प्रेमी जमले असून, देशातील विविध राज्यांतून अडीच हजारहून अधिक चालक सहभागी झाले आहेत. विजेत्यांना दोन फॉर्च्युनर, दोन थार गाड्या, एक ट्रॅक्टर, दोन बुलेट आणि १५० हून अधिक टू व्हीलर बक्षिसे म्हणून दिली जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शर्यतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राज्यातील पहिले बैलगाडा शर्यत अधिवेशन आणि महिलांसाठी खास शर्यत, ज्यात १०० गाई संवर्धनासाठी देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ मुंबईतील मंत्रालयात होणार आहे.

Published on: Nov 09, 2025 05:00 PM