सुरेश धसांच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळेंचाच ट्रॅप, राऊतांचा सनसनाटी दावा काय?

सुरेश धसांच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळेंचाच ट्रॅप, राऊतांचा सनसनाटी दावा काय?

| Updated on: Feb 20, 2025 | 12:00 PM

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीवरून षडयंत्र रचल्याचा धस वारंवार म्हणतायत. पण संजय राऊतांनी आता सनसनाटी दावा केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धसांच्या विरोधात ट्रॅप रचल्याचं सांगून राऊतांनी खळबळ उडवली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीवरून आपल्याविरोधात षडयंत्र रचलं आणि तो नेता बीडचा असल्याचं धस म्हणाले. मात्र हा ट्रॅप खुद्द बावनकुळे यांनीच रचलाय का? असा सवाल करत संजय राऊतांनी खळबळ उडवली आहे. मुंडे आणि धसांमधले मनभेद दूर करण्यासाठी आपणच जेवणासाठी दोघांनाही बोलावलं असं बावनकुळे यांनी सांगितलं आणि त्यानंतरच मुंडे आणि धसांची भेट झाली हे समोर आलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे यांवर धस आक्रमक होते. मात्र भेट घेऊन डील केल्याचा आरोप राऊतांनी केला तर वडेट्टीवारांनी कुठेतरी गडबड आहे असा आरोप केलाय. बावनकुळे यांच्या एका वक्तव्यानंतर काय काय झालं तेही समजून घेऊयात. धनंजय मुंडे सोबत दोनदा भेट झाली हे समोर आलय. एक भेट बावनकुळे यांच्या घरी आणि दुसरी भेट स्वतः मुंडे यांच्याच घरी. चार ते साडेचार तास भेट झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलय. मात्र भेटीच्या वेळेवर आक्षेप घेत धस म्हणालेत २० ते ३० मिनिटच भेटलो. बदनामीसाठी भेटीवरून षडयंत्र रचणारा नेता बीडचा असल्याचं धस म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Feb 20, 2025 12:00 PM