ShivSena UBT vs Shinde : तुंबलेल्या मुंबईवरुन ठाकरेंच्या सेनेचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

ShivSena UBT vs Shinde : तुंबलेल्या मुंबईवरुन ठाकरेंच्या सेनेचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

| Updated on: May 27, 2025 | 5:43 PM

Mumbai floods : पावसामुळे मुंबईत साचलेल्या पाण्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे.

आनंद दिघे यांनी स्वप्नात येऊन विचारलं एकनाथ शिंदे कुठे आहे? असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. मुंबई तुंबण्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भ्रष्टनाथ असा केला आहे. त्यामुळे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर शिवसेना उबाठा गटाकडून शिंदे यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवण्यात आलेली आहे.

मान्सून दाखल होताच पहिल्याच पावसात मुंबईची दैना झालेली बघायला मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरातल्या अनेक भागांत पाणी साचल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली.

Published on: May 27, 2025 05:43 PM