ShivSena : लॉटरी लागली अन् शिंदे CM पण टिकवलं पाहिजे! मटका.. लॉटरी… भाजप नेत्याच्या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेचे नेते भिडले

ShivSena : लॉटरी लागली अन् शिंदे CM पण टिकवलं पाहिजे! मटका.. लॉटरी… भाजप नेत्याच्या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेचे नेते भिडले

| Updated on: Aug 16, 2025 | 5:58 PM

'प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे', असा खोचक टोला गणेश नाईकांनी लगावला.

भाजप मंत्री आणि नेते गणेश नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य करत गणेश नाईक यांनी जिव्हारी लागणारी टीका केली. दरम्यान, मंत्री गणेश नाईकांना लॉटरी ऐवजी मटका म्हणायचं असेल असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलंय. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेवर आणि संजय राऊत यांनी लगावलेल्या खोचक टीकेवर एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आला आहे. ‘गणेश नाईक यांचं वय जास्त झालं असेल म्हणून ते तसं बोलत असतील’, असं शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

Published on: Aug 16, 2025 05:58 PM