Sanjay Raut : नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत स्पष्टच म्हणाले, असू द्या ना…

Sanjay Raut : नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत स्पष्टच म्हणाले, असू द्या ना…

| Updated on: Jul 16, 2025 | 2:16 PM

ठाकरे गट शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर चर्चा सुरू होताच यावर राऊतांना सवाल केला असताना बघा काय म्हणाले ?

‘नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात समानाच्या पहिल्या पानावर असू द्या ना… सरकारी जाहिरात आहे. मंत्री येतात आणि जातात.’, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. सामना या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आज भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासंदर्भात संजय राऊत यांना पत्रकारांनी सवाल केले असता त्यांनी हे भाष्य केले आहे. पुढे संजय राऊत असेही म्हणाले, सामनाच्या फ्रंट पेजला मेरिटाईम बोर्डाची जाहिरात आहे ना…मेरिटाईम बोर्ड काही नारायण तातू राणे यांचं नाहीये. त्यांच्या नावावर नाही. मेरिटाईम बोर्ड हे सरकारचं आहे. इतकंच नाहीतर संजय राऊतांनी यावर बोलताना स्पष्टपणे सांगितले की, आमचं भांडण हे राज्यातील भ्रष्ट राज्यकर्त्यांशी आणि गद्दारांसोबत आहे. सरकारशी आम्ही निपटून घेऊ.

Published on: Jul 16, 2025 02:16 PM