Sanjay Raut : इंग्रजी येत नाही, म्हणून हिंदीची सक्ती… ; संजय राऊतांचा थेट आरोप

Sanjay Raut : इंग्रजी येत नाही, म्हणून हिंदीची सक्ती… ; संजय राऊतांचा थेट आरोप

| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 11:10 PM

Sanjay Raut Allegations On PM Modi : राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत शाळांना हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर हा निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना इंग्रजी येत नाही. त्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी सगळ्यांना हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर हा निशाणा साधला आहे. आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सत्तेची करा, त्याची हिंमत आहे का? असा प्रति प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हिंदी ही आमच्यावर लादू नका. मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही. ज्या शहरात जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो. तेथे हिंदी सक्ती करण्याची गरज नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.

दरम्यान, यावेळी बोलताना राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. हा निर्णय समोर येताच राज ठाकरे यांनीही मोठी पोस्ट केली. इतक्या लवकर इतकी मोठी पोस्ट कशी केली गेली? या ट्विटची स्क्रिप्ट सागर बंगल्यावरून आलं का? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

Published on: Apr 18, 2025 11:50 AM