ठाकरेगटाकडून शिवसेना पक्ष अन् चिन्ह का गेलं? संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलं…
Sanjay Raut : आशिष शेलार म्हणजे न्यायालय नाही, न्याय नाही!; संजय राऊत कडाडले. टीका करताना म्हणाले...
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीठाकरेगटाकडून शिवसेना पक्ष अन् चिन्ह का गेलं? भाष्य केलंय. यावेळी त्यांनी भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावरही टीका केली आहे. “आज आमच्याकडे शिवसेना नाव आणि चिन्ह नाही, याला निवडणूक आयोगाची बदमाशी जबाबदार आहे.पण तरी लोक आमच्या पाठीशी आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे”, असं राऊत म्हणालेत. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणजे न्यायालय नाही ते न्याय नाही. तुम्ही गेल्या सहा महिन्यातले बोला. तुम्ही केस केली आहे. तुम्ही सांगा तो घोटाळा कोणी केला. आम्ही सांगायला तयार आहोत. खरंतर ही माहिती आशिष शेलारांकडे आहे. ते ती मांडीखाली का घेवून बसले आहेत कळत नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.
Published on: Feb 28, 2023 01:21 PM
