निवडणूक आयोग-सर्वोच्च न्यायालय भाजपच्या खिशात आहे काय?; संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरून भाजपवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. पाहा...
मुंबई : संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरून भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली आहे. “निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय यांच्या खिशात आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे निकाल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयात निकाल आपल्याच बाजूने लागेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांना ब्रेकींग न्यूज देत सांगतात.शिवसेनेचे चिन्ह जाईलते शिंदे यांनाच मिळेल. यावर No comments!”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
Published on: Feb 12, 2023 10:31 AM
