Sanjay Shirsat : निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
Shivsena Shinde Group vs Thackeray Group : नाशिकमध्ये आज शिवसेना उबाठा गटाचा निर्धार मेळावा पार पडत आहे. त्यावर शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.
शिवसेना उबाठा गटाचा नाशिकमध्ये आज निर्धार मेळावा पार पडत आहे. त्यावर आता शिंदे सेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. उबाठाचा निर्धार मेळावा नाही, तर पक्ष बचाव मेळावा असल्याचं शिरसाट यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. तसंच ते युज अँड थ्रो वाले लोक आहेत, असंही शिरसाट म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, त्यांचा निर्धार मेळावा नाही आहे. हा पक्ष बचाव मेळावा आहे. ज्यांच्यामुळे पक्ष डॅमेज होतो अशी काही नावं समोर आल्यामुळे कदाचित त्यांना त्यांनी बाजूला सारलं असावं. त्यांना पण त्यांची जागा दाखवली पाहिजे. शिंदे साहेब कधी कधीच बोलतात पण योग्य बोलतात. हे लोक युज अँड थ्रो वाले आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.
Published on: Apr 16, 2025 02:17 PM
