Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणाला 4 महिने उलटले, संतोष देशमुखांच्या भावाचा बीड पोलिसांना एकच सवाल, ‘कृष्णा आंधळे कसा…’

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणाला 4 महिने उलटले, संतोष देशमुखांच्या भावाचा बीड पोलिसांना एकच सवाल, ‘कृष्णा आंधळे कसा…’

| Updated on: Apr 09, 2025 | 1:55 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महीने पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याला कधी अटक होणार? असा सवालच धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने पूर्ण झाले आहेत. मात्र तरी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. यापार्श्वभूमीवरच सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी धनंजय देशमुख यांनी एकच सवाल केला. ते म्हणाले, फरार आरोपी कृष्णा आंधळे कसा सापडत नाही? हे बीड पोलिसांनी सांगावं…आरोपी कृष्णा फरार असताना बीड पोलिसांसोबत वावरत होता. कृष्णा आंधळे हा विष्णु चाटे याच्या कार्यालयात बसत होता, तेव्हाही तो फरार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता पोलीस यंत्रणेकडून सांगणं गरजेचे आहे की, कृष्णा आंधळे सध्या कुठे आहे? त्याचा तपास यंत्रणेला काय सुगावा लागला आहे? तो कधी अटक होणार? या सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस यंत्रणेनी द्यावीत, अशी विनंती देखील धनंजय देशमुख यांनी केली.

Published on: Apr 09, 2025 01:55 PM