ShahajiBapu Patil : मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते – शहाजी बापू पाटील
ShahajiBapu Patil On Eknath Shinde : शहाजी बापू पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपण निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री झाले असते असणं म्हंटलं आहे.
मी निवडून आलो असतो, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हंटलं आहे. मी 2019 ला निवडून आलो तेव्हा ठाकरे आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. माझी रास शिवसेनेची आहे, असंही यावेळी शहाजीबापू पाटलांनी म्हंटलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, ‘मी जर निवडून येत होतो तर एकनाथ शिंदे हे नक्की मुख्यमंत्री झाले असते. 95 साली निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मी 2019 ला निवडून आलो तेव्हा देखील ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी उठाव केला तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. माझी रास शिवसेनेची आहे, मी कसा कॉंग्रेसकडे गेलो मला माहीत नाही’, असंही यावेळी शहाजीबापूंनी म्हंटलं आहे.
Published on: May 01, 2025 10:01 AM
