उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले शरद पवार

| Updated on: Mar 29, 2024 | 4:11 PM

सातारा लोकसभेसाठी भाजपाने अद्याप उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र, साताऱ्यात उदयनराजेंविरोधात तगड्या उमेदवाराचा शोध शरद पवार यांनी सुरु केला आहे. त्यासाठी शरद पवार यांनी सातारा येथे आज आढावा बैठक बोलावली होती.

Follow us on

सातारा : सातारा लोकसभेसाठी भाजपाने सातवी यादी जाहीर झाली तरी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील अजून सातारा लोकसभेसाठी कोणाचे नाव नक्की केलेले नाही. सातारा लोकसभा लढविण्यासाठी शरद पवारांचे विश्वासू असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. आपण प्रकृतीच्या कारणामुळे यंदा निवडणूक लढविणार नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र पक्षासाठी आपण काम करीत राहू असेही त्यांनी म्हटले आहे. सातारा येथील उमेदवार देताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करण्यात येत आहे. सर्वांच्या सूचना ऐकून घेतल्या आहेत. काही जणांनी आपले देखील नाव साताऱ्यासाठी सूचविले. मात्र आपल्यावर इतरही जबाबदाऱ्या असल्याने ते शक्य होणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.