Sharad Pawar | बारामती हेल्दी हार्वेस्ट व्हेजीटेबल आऊटलेटचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बारामती हेल्दी हार्वेस्ट व्हेजीटेबल आऊटलेटचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शरद पवारांसह इतरही मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव म्हणजे शरद पवार. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. नुकताच देगलूर येथे भाजपचा मोठा पराभव झाला. तसचं दादरा नगर हवेली येथेही भाजपला हार पत्करावी लागली. त्यानंतर शरद पवारांची महाविकास आघाडीला घेऊन पुढील रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. अशावेळी शरद पवार हे बारामतीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. बारामती हेल्दी हार्वेस्ट व्हेजीटेबल आऊटलेटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
