Rohini Khadse : ‘…त्यांना मन की बात सांगावी’, ‘सौगात ए मोदी’ कीटवरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं

Rohini Khadse : ‘…त्यांना मन की बात सांगावी’, ‘सौगात ए मोदी’ कीटवरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं

| Updated on: Mar 28, 2025 | 4:34 PM

‘सौगात ए मोदी’ कीटवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी सौगात ए मोदी कीटवरून भारतीय जनता पक्षाला चांगलंच डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘भाजप पदाधिकाऱ्यांचं काउंसलिंग करावं’, असं राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तर वितुष्ट निर्माण करणाऱ्यांना मन की बात सांगावी, असा खोचक सल्लाही […]

‘सौगात ए मोदी’ कीटवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी सौगात ए मोदी कीटवरून भारतीय जनता पक्षाला चांगलंच डिवचल्याचे पाहायला मिळत आहे. ‘भाजप पदाधिकाऱ्यांचं काउंसलिंग करावं’, असं राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय. तर वितुष्ट निर्माण करणाऱ्यांना मन की बात सांगावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिलाय.

काय आहे ट्वीट बघा…

चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे ! ‘सौगात ए मोदी’ च्या माध्यमातून आपल्या पंतप्रधानांनी एकोप्याचा संदेश दिला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खुप खुप आभार… तर महाराष्ट्रात समाजा-समाजात वितुष्ट निर्माण करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही ही ‘मन की बात’ सांगावी, वेळ पडल्यास त्यांचे काउंसलिंग करावे , जेणे करुन आमच्या महाराष्ट्रात सुख-शांती-समृद्धी लाभेल…

Published on: Mar 28, 2025 04:30 PM