Sharad Pawar : या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत – शरद पवार

Sharad Pawar : या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत – शरद पवार

| Updated on: Apr 30, 2025 | 12:18 PM

Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

पहलगाम हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. त्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी म्हंटलं आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आमच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. या प्रश्नावर सर्व देश एक आहे, सर्व पक्ष एकत्र आहेत, सर्व नेते एक आहेत, हा संदेश सर्वत्र पाठवण्यासाठी अधिवेशन उपयुक्त ठरेल, असं देखील शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पहलगामध्ये झालेला हल्ला हा या देशावरील हल्ला आहे. ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशासाठी दिलेली किंमत आहे. त्यामुळे या ठिकाणी धर्म, जात, पात भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत. भारतीयांवर हल्ला कोणत्याही शक्ती करत असतील, तर देश वासियांना देखील कशाचीही अपेक्षा न करता एकत्र राहावे लागेल, अशा शब्दात शरद पवार यांनी धर्म विचारुन हल्ला झाला नसल्याच्या त्या वक्तव्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Published on: Apr 30, 2025 12:18 PM