Sanjay Raut | शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते

Sanjay Raut | शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते

| Updated on: Jan 24, 2026 | 1:41 PM

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची गटस्थापना अजूनही होत नाही यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटस्थापना ही 'घटस्थापनेपर्यंत' पुढे जाऊ शकते कारण दोन्ही पक्षात अजूनतरी एकी झाल्याचं दिसून येत नाही आहे.

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची गटस्थापना अजूनही होत नाही यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटस्थापना ही ‘घटस्थापनेपर्यंत’ पुढे जाऊ शकते कारण दोन्ही पक्षात अजूनतरी एकी झाल्याचं दिसून येत नाही आहे. ‘शिंदे रुसून बसलेत आणि सारखे दिल्लीत फेऱ्या मारतात’ असा टोला राऊतांनी लगावला आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर होईल असं आश्वासन शिंदेनी दिलं होतं त्यावर टीका करत राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं’ अशा भूमिकेची लोकं या पक्षात आहेत म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर झालोय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

Published on: Jan 24, 2026 01:41 PM