Bharat Gogawale : शिंदेंच्या मंत्र्याचा आणखी एक अघोरी पूजेचा व्हिडीओ… पालकमंत्रिपदासाठी सारं काही? दादांच्या राष्ट्रवादीतूनच गंभीर आरोप
शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक अघोरी पूजेचा व्हिडिओ समोर आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप सुरज चव्हाण यांनी केला आहे.
शिंदे यांचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक अघोरी पूजेचा व्हिडिओ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने समोर आणला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अघोरी पूजा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सुरज चव्हाण यांनी व्हिडिओ ट्विट करताना बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या म्हणजे पालकमंत्री असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडिओत तीन महाराज दिसत असून भरत गोगावलेही दिसताहेत. दोघेजण भगव्या वस्त्रात असून गोगावले यांच्या अगदी समोर बसलेला महाराज काळ्या रंगाच्या वेशात आहे. माथ्याला काहीतरी लावा असं गोगावले या व्हिडिओतही सांगताहेत.
आता संविधानिक पदावर बसून अघोरी विद्येला प्रोत्साहन देणाऱ्या मंत्री गोगावलेवर शिंदेनी कारवाई करावी नाहीतर पुढचं पाऊल उचलू असं सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गोगावले यांचा व्हिडिओ ज्यांनी समोर आणला ते सुरज चव्हाण महायुतीतलेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच आहेत. पण रायगडच्या पालकमंत्री पदावरच शिंदे यांची शिवसेना विशेषतः गोगावले आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामधला वाद टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे महायुतीत असूनही गोगावलेवर असे व्हिडिओ बॉम्ब टाकणं सुरू आहे.
