तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले

तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरलाच जावं लागेल; धंगेकर बरसले

| Updated on: Jan 11, 2026 | 2:03 PM

पुणे महानगरपालिका निवडणूका चालू आहेत आणि कित्येक वर्ष चंद्रकांत पाटलांनी गुन्हेगारीला थारा देण्यासाठी बरेचसे गुन्हेगार जवळ ठेवले होते. राष्ट्रवादीचे नेते अमोल बालवडकर यांचे निलेश घायवळ यांच्या सोबत फोटो आहेत म्हणून अमोल यांना उमेदवारी दिली नाही.

पुण्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे जुने फोटो ट्विट केले आहेत. फोटोत चंद्रकांत पाटलांसोबत निलेश घायवळ असल्याचं सांगितलं जातंय, यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन वाद सुरु झालाय. यावर रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणूका चालू आहेत आणि कित्येक वर्ष चंद्रकांत पाटलांनी गुन्हेगारीला थारा देण्यासाठी बरेचसे गुन्हेगार जवळ ठेवले होते. राष्ट्रवादीचे नेते अमोल बालवडकर यांचे निलेश घायवळ यांच्या सोबत फोटो आहेत म्हणून अमोल यांना उमेदवारी दिली नाही. यावर वक्तव्य करत धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी एवढ्या गुन्हेगारांना थारा दिलाय, त्यांना तर कोल्हापूरला जावं लागेल. चंद्रकांत पाटील बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी स्वतःच आत्मपरीक्षण करावं, अशी खोचक टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Published on: Jan 11, 2026 02:03 PM