‘महाराष्ट्र दुश्मनापुढे वाकणार नाही’ ; संजय राऊत यांचा लढण्याचा निर्धार

| Updated on: Mar 21, 2022 | 11:41 AM

आमचं हिंदुत्व  (hindutva) कातडीचं आहे आणि शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व सालीचं आहे, अशी टीका भाजपने (bjp) केली आहे. भाजपच्या या टीकेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

Follow us on

आमचं हिंदुत्व  (hindutva) कातडीचं आहे आणि शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व सालीचं आहे, अशी टीका भाजपने (bjp) केली आहे. भाजपच्या या टीकेवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. बाप रे, होय का? छान… हे कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा डिवचले आहे. यावेळी राऊत यांनी मनसेलाही टोला लगावला. कुणी काय करत असेल तर हा आपआपल्या बुद्धीचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माताीत जन्म घेतला हे महत्त्वाचं. महाराज या मातीत जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. बाकी इतर प्रांतांना भुगोल आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यानी करावं. महाराजांचं व्यक्तिमत्व थोर आणि महान आहे. त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.