जयंत पाटलांचं तिथं मन लागत नाहीये… राष्ट्रवादी फुटायच्या मार्गावर, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीतील दोन गट एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू असताना संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांबाबत नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदांचं वाटप करण्यात आलं आहे. तर जयंत पाटील यांच्याविरोधात पक्षातीलच तरूण नेत्यांकडून नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जयंत पाटील यांनी सुरू केलेल्या परस्पर निवडीवरून शरद पवारांकडे तक्रार जाणार असही सूत्रांमार्फत कळतंय. तर नाराजी असणाऱ्या तरूण नेत्यांमध्ये रोहित पवार यांचा समावेश आहे की नाही? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. तर जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य करत जयंत पाटलांचं मन तिथं लागत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर पवारांची राष्ट्रवादी फुटायच्या मार्गावर असल्याचेही मोठं वक्तव्य शिरसाट यांनी केलंय.
Published on: May 30, 2025 03:28 PM
