Uday Samant : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या खळखट्याक भूमिकेवर स्पष्टच म्हणाले…

Uday Samant : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या खळखट्याक भूमिकेवर स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Apr 05, 2025 | 11:09 AM

मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंशी बोलेन, त्यानंतर त्यात काय सुधारणा करण्यात येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले.

मराठी भाषेच्या मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहे, अशातच आज महायुतीचे मंत्री, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठी भाषेच्या मुद्यावरून राज यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. याभेटीनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठीसंदर्भात ज्या घडामोडी सुरू आहे, त्याच संदर्भात बोलण्यासाठी, मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरे यांनी मला बोलावलं होतं. इथे येताना मी एकनाथ शिंदेंना सांगून, त्यांची परवानगी घेऊन आलो. महाराष्ट्रामध्ये ज्या बँका, संस्थांमध्ये मराठीबाबत जो निर्णय घेतला जातो, तिथे ज्या गोष्टी घडत आहेत, त्याचा प्रतिबंध कसा करायचा यांसदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत, असे उदय सामंत म्हणाले.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, अनेक भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात. अनेक राज्यातील लोकं महाराष्ट्रात आलेली आहेत. सगळ्या भाषांचा आदर आहे. पण ज्या पद्धतीने मराठी भाषिक लोकांवर काही ठिकाणी अन्याय, दादागिरी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासंदर्भात काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी काहीतरी कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.

Published on: Apr 05, 2025 11:09 AM