Bharat Gogawale : ये सब नॅपकीन का कमाल… गोगावलेंचा पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा, बघा काय म्हणाले?

Bharat Gogawale : ये सब नॅपकीन का कमाल… गोगावलेंचा पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा, बघा काय म्हणाले?

| Updated on: Jun 09, 2025 | 1:13 PM

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बधा काय म्हणाले गोगावले?

नॅपकीन खांद्यावर घेतला नसता तर विषय एवढा पुढे गेला नसता, असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. वेटर खांद्यावर नॅपकीन ठेवतात, तसा नॅपकीन सुनील तटकरे यांनी खांद्यावर घेतला, असं भरत गोगावले म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी नॅपकीन दाखवून केलेल्या नकलेवरून भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधला आहे. बघा काय म्हणाले गोगावले?

दरम्यान, रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मे महिन्यात प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली होती. खांद्यावर रूमाल ठेवत आणि हात जोडून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची स्टाईल करून दाखवली होती. सुनील तटकरे यांच्या भाषणातील तेवढाच नक्कल केलेला भाग व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गोगावले यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल केलाय.

Published on: Jun 09, 2025 01:13 PM