यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 11:25 PM

भांब राजा सर्कलमध्ये सुनील डीवरे यांचा भरपूर दबदबा होता. या घटनेनंतर भांब राजा गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. हत्येच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पवन नामक तरुणाशी डीवरे यांचा व्यावसायिक संघर्षातून वाद झाला होता.

यवतमाळ : शिवसेनेचे पदाधिकारी यवतमाळ बाजार समिती संचालक सुनील डीवरे(Sunil Diware) यांची आज त्यांच्या राहत्या घरासमोरच गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या(Murder) करण्यात आली आहे. डीवरे हे भांब राजा गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच होते. यंदा त्यांची पत्नी अनुप्रिया डीवरे या सरपंच आहेत. सायंकाळी 7.30 च्या सुमारास सुनील डीवरे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्यावर घरासमोर अचानकपणे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यात सुनिल डीवरे यांच्या छातीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्याची माहिती आहे. सुनील डीवरे यांच्या डोक्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार झाल्याचीही माहिती आहे. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली आणि कुणी केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास करीत आहेत.