Special Report | मुर्मुना पाठींबा देऊन खासदार शांत होणार?
खासदार संजय राऊत यांनी याबाबत पक्षप्रमुखांबरोबर चर्चा झाली आहे आणि नेहमीच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढे जाऊन राष्ट्रपती उमेदवारासाठी शिवसेनेने आपली भूमिका बजावली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनंतर आता खासदारांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणींचा पाठपुरावा चालूच ठेवला आहे. भविष्यात भाजप आणि शिंदेशी जुळवून घ्या अशी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे तर राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर चर्चेची भाजपसोबत दारं उघडी राहतील असंही त्यांनी आजच्या बैठकीत सांगितले आहे. देशात भाजपनं मोठी ताकद निर्माण केली असून आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, शिंदेंसोबत 50 आमदार आहेत, ते आजही मनाने आपलेच आहेत, शिंदेंशीही जुळवू घेतलं पाहिजे अशा प्रकारची मागण्या वजा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे Shi
Published on: Jul 11, 2022 09:14 PM
