Sambhajinagar : क्या हुआ तेरा वादा?, शिवसेना ठाकरे गटाचा संभाजीनगरात ट्रॅक्टर मोर्चा

Sambhajinagar : क्या हुआ तेरा वादा?, शिवसेना ठाकरे गटाचा संभाजीनगरात ट्रॅक्टर मोर्चा

| Updated on: Jun 11, 2025 | 10:43 AM

Thackeray Group Morcha : ठाकरे गटाकडून आज संभाजीनगरमध्ये महायुती सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा? म्हणत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक प्रश्नांसाठी संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना हे आंदोलन करणार आहे. या ट्रॅक्टर मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील सहभागी होणार आहेत.

शहरातल्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालया पर्यंत हा ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे. शेतकऱयांची कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 45 हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱयांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदान परतावा आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेले सरकार आता सगळे विसरले आहे. म्हणूनच ‘क्या हुआ तेरा वादा?’ म्हणत सरकारला जाब या आंदोलनांद्वारे विचारला जाणार असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं गेलं आहे. दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

Published on: Jun 11, 2025 10:43 AM