शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन करणार

| Updated on: Mar 15, 2023 | 8:19 AM

Farmer Andolan : मंद्रूपमधले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी बैलगाडीने प्रवास करत मंद्रूप ते मुंबईपर्यंत जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानाबाहेर ते आंदोलन करणार आहेत.

Follow us on

सोलापूर : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाचं आयोजन केलं आहे. मंद्रूपहून मुंबईकडे निघालेला शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा सोलापूर शहरात पोहोचला आहे. मंद्रूपमधले शेतकरी आपल्या मागण्यांसाठी बैलगाडीने प्रवास करत मंद्रूप ते मुंबईपर्यंत जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानाबाहेर ते आंदोलन करणार आहेत. मंद्रूप एमआयडीसीच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरून एमआयडीसीचे नाव काढावं आणि शेतकऱ्यांची नावं लावावीत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मागील 174 दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने केवळ आश्वासन दिलं. त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे आता आर या पारची भूमिका घेत मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडीने प्रवास शेतकऱ्यांनी सुरु केलाय. दरम्यान हे शेतकरी काल सोलापुरात मुक्कामी होते. आज ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.