Solapur News : वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल

Solapur News : वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल

| Updated on: Mar 15, 2025 | 5:10 PM

Weather Updates Solapur : राज्यात उन्हाळा सुरू झाला असून यंदा सुरुवातीलाच सर्वत्र कडाक्याचं ऊन जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या वाढत्या झळा बघता मे महिन्यापर्यंत उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सोलापूरमध्ये तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेने सोलापूरकर चांगलेच हैराण झालेले बघायला मिळत आहेत. जवळपास 40 अंशच्या वर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचं तापमान गेलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा पारा वाढतच असल्याने उष्णतेच्या झळा सोलापूरमध्ये जाणवत आहेत. सकाळी 9 वाजेनंतरच उन्हाचा चटका बसायला सुरू होत असल्याने कामाशिवाय घराबाहेर पडायचं नागरिक टाळत आहे. दुपरच्यावेळेत रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.  सध्या मार्च महिना सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने गाठलेल्या उच्चांकाने नागरिक हैराण झालेले असतानाच ऐन उन्हाळ्यात काय होणार याची धास्ती सोलापूरकरांना पडली आहे.

Published on: Mar 15, 2025 05:10 PM