Special Report | येत्या 5 दिवसात मुंबई-पुण्यात रुग्णवाढीचा उद्रेक

| Updated on: Jan 10, 2022 | 10:23 PM

मुंबई आणि पुण्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पाच दिवसांत तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णवाढ होईल असा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त केला जातोय. मात्र उद्रेकानंतर फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत ही रुग्णवाढ झपाट्याने खाली येईल, असंही सांगितलं जात आहे. असा अंदाच कानपूर आयआयटीने व्यक्त केला आहे. कानपूर आयआयटीच्या प्राध्यपकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांत मुंबई आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्णवाढ होईल.

Follow us on

देशात पहिल्या लाटेची सुरुवात केरळमधून झाली होती. दुसऱ्या लाटेची सुरुवात महाराष्ट्रात अमरावतीमधून झाली आणि तिसऱ्या लाटेची सुरुवात एकाच वेळी मुंबई आणि दिल्लीतून झाली. ज्या वेगानं मुंबई आणि दिल्ली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित झाल्यात त्याच वेगानं त्या कोरोना संक्रमणातून मुक्त होतील, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. भारतात साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट सर्वोच्च पातळीवर असेल. त्यानंतर 15 मार्च ते 25 मार्च दरम्यान एकतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा खात्मा होईल किंवा तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होईल.