Special Report | पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी अजितदादा मैदानात!

Special Report | पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी अजितदादा मैदानात!

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 9:27 PM

भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर आल्यानं नद्यांचं पाणी काठावरील गावं आणि शहरात शिरलं आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात 2019 प्रमाणेच पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरस्थितीची पाहणी केली. भिलवडीमध्ये अजित पवार यांनी बोटीतून पुराने नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि विश्वजीत कदमही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पूरग्रस्तांशीही संवाद साधला.