Special Report | महाराष्ट्रावर महासंकट, 8 ठिकाणी दरडी कोसळल्या, आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू

Special Report | महाराष्ट्रावर महासंकट, 8 ठिकाणी दरडी कोसळल्या, आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:51 PM

3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे. राज्यात एकूण 8 जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यात 80 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसानं हाहा:कार माजलाय. चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे. राज्यात एकूण 8 जिल्ह्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यात 80 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 23, 2021 08:51 PM