Special Report | सत्तेवरून महाभारत, कोण कौरव, कोण पांडव?
मोदी-ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर उठलेलं वादळ शांत होण्याऐवजी आणखी पेटणार असंच दिसतंय. त्यातच संजय राऊतांनी दिल्लीत पोहोचताच महाभारतातल्या लढाईचा दाखला देत राज्यातल्या ठाकरे सरकारची काय स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत दिल्लीत गेलेत. पवारांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यानंतर राऊत दिल्लीत पोहोचलेत. त्यामुळे मोदी-ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर उठलेलं वादळ शांत होण्याऐवजी आणखी पेटणार असंच दिसतंय. त्यातच संजय राऊतांनी दिल्लीत पोहोचताच महाभारतातल्या लढाईचा दाखला देत राज्यातल्या ठाकरे सरकारची काय स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
Published on: Jul 01, 2021 09:05 PM
