Anil Parab | अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांची कृती समितीत बैठक सुरू

| Updated on: Nov 26, 2021 | 6:59 PM

एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. या घोषणेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचारी संपातून माघार घेतली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईभ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

Follow us on

या बैठकीत एसची कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा ही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. अनिल परब यांनी कृती समितीला चर्चेचं आवाहन केलं होतं. मुंबई सेट्रेल इथल्या एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक पार पडत आहे. दरम्यान, पगारवाढीनंतर आज 12 ते 13 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, असा दावा परब यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. तसंच कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.