Subhash Desai : हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
Subhash Desai On Hindi Mandetory Issue : राज्यात हिंदी सक्तीचा वाद कायम आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीची केली जाणार नाही असं म्हंटल्यानंतर त्यावर सुभाष देसाई यांनी आणखी एक मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हिंदीची सक्ती नाही, मग त्याबद्दल जीआर काढा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी केली आहे. मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं देखील यावेळी बोलताना देसाई यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्यक्ती म्हणून मी विरोध करत नाही. पं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी हिंदी सक्तीच्या बाबतीत असा उल्लेख केला आहे की, हिंदीची सक्ती केली जाणार नाही. पण तसा शासन आदेश त्यांनी काढला नाही. त्यांनी तसा जीआर काढायला हवा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
Published on: May 12, 2025 09:57 AM
