Sudhir Mungantiwar : ‘दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर..’, मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

Sudhir Mungantiwar : ‘दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर..’, मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद

| Updated on: Apr 01, 2025 | 5:33 PM

Maharashtra Politics : महायुतीच्या मंत्रिमंडळातून वगळल्याने काही नेते नाराज आहेत. त्यात सुधीर मुनगंटीवार देखील आहेत. आज पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी याबद्दलची खदखद बोलून दाखवली.

मंत्रीमंडळातून वगळल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत. याबद्दलची खदखद मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. राज्य गीताचा शेवटचा शब्द मी निवडला आहे, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज केलं आहे. तसंच दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूर वजा केल्यास विकासाला उत्तर शून्य येईल, असंही मुनगंटीवार यांनी म्हंटलं आहे. तर चंद्रपूरचा 1 जोडला तर दहा नंबरी विकास होईल. त्यासाठी आपण आपली शक्ती चंद्रपूरच्या विकासाच्या पारड्यात टाकावी, एवढीच विनंती आहे, असं देखील ते म्हणाले.

Published on: Apr 01, 2025 05:33 PM