SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 24 July 2021

| Updated on: Jul 24, 2021 | 8:56 AM

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे निरा नदीकाठच्या नागरीकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निरा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

Follow us on

वीर धरण क्षेत्रातील गावांमध्ये व नीरा नदीच्या धरण साखळीमध्ये गेली तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी वीर धरण विद्युत गृहातून रात्री 8:०० वाजता 8०० क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता.. शनिवारी पहाटे 6:०० वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

वीर धरणाच्या विद्युत गृहातून रात्री 8:०० वाजता 800 क्युसेक्स वेगाने निरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. रात्री 12:30 धरणाच्या सांडव्यातून वाजता 4,637 क्युसेक्स वेगाने, 2 वाजता विसर्गाचा वेग वाढवून 12,408 क्युसेक्स, तर पहाटे 6:०० वाजता 21 हजार 505 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.