आम्ही आमच्या पैशानं मटण खातो…; सुप्रिया सुळेंच्या व्यक्तव्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या, "माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?" या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या, “माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडले आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “कोणी काय खावे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या वारकरी समाजाचे आराध्य दैवत पांडुरंगाला मांसाहार चालतो, असे म्हणणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा आदर करू शकत नसाल, तर किमान त्याचा अपमान तरी करू नका. पण शरद पवार यांच्या मुलीकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार?”
दरम्यान, या टीकेनंतर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले, “या प्रश्नाचे उत्तर मी देणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्रातील तमाम वारकरी समाज देईल.”
