Supriya Sule : वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार – सुप्रिया सुळे

Supriya Sule : वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागेल ती मी लढणार – सुप्रिया सुळे

| Updated on: May 21, 2025 | 5:16 PM

Supriya Sule On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत.

वैष्णवी हगवणे हिला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली होती, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. हगवणे कुटुंबातील पुरुष गायब कसे होऊ शकतात असा सवल्ही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसंच वैष्णवीसाठी जी लढाई लढावी लागणार ती मी लढेल असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. वैष्णवी ही अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती. शशांक हगवणे याच्याशी वैष्णविचा प्रेमविवाह झालेला होता. लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी बक्कळ हुंडा देखील दिलेला होता, असं असूनही तिचा हुंड्यासाठी सासरी छळ होत होता असं तिच्या वडिलांनी म्हंटलं आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी याबद्दल बोलताना या 24 वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वत: वैष्णवीची लढाई लढू असं म्हंटलं आहे.

Published on: May 21, 2025 05:16 PM