Sushma Andhare : ते आम्हाला बांधील नाही, पण.. ; ठाकरे – फडणवीसांच्या भेटीवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
Raj Thackeray - CM Fadnavis Meeting : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला लागल्या असून सुषमा अंधारे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालेली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होतं असल्याने भाजप ठाकरेंच्या युतीत खोडा घालेल का? असा प्रश्न निर्माण होतं आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी युतीच्या मुद्द्यावर भाष्य केल्यावर आमच्या पक्षाने आणि पक्ष प्रमुखांनी लागलीच सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता मनसे प्रमुखांच्या मनात काय आहे, हे आपण सांगू शकत नाही. त्यांनी एक मोठं मौन या विषयावर सध्या साधलं आहे. त्यातच आजची त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट कोणत्या कारणासाठी आहे ते आपल्याला माहीत नाही. मात्र त्यांनी कोणाला भेटावं, भेटू नये हा त्यांचा प्रश्न आहे. ते आम्हाला बांधील नाही. ते त्यांचा निर्णय घ्यायला सक्षम आहे, समर्थ आहेत, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.
