Ranjit Kasle : शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
बीड हत्याकांडातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला आज पहाटे बीड पोलिसांनी पुण्याच्या स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतलं आहे.
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या स्वारगेटमधून बीड पोलिसांनी पहाटेच्या सुमारास रणजित कासलेला अटक केली. शरण येण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. रणजित कासले काल दिल्लीतून पुण्यात दाखल झालेला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी लागलीच ही कारवाई केली आहे.
आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी ऑफर असल्याचा दावा कसलेने केला होता. यात त्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले होते. त्यानंतर कासलेने काल आपण बीड पोलिसांना शरण येणार असल्याचं म्हंटलं होतं. हा व्हिडीओ बनवल्यानंतर कासले काल दिल्लीतून पुण्यात दाखल झाला. पुण्यात स्वारगेट परिसरात एका हॉटेलमध्ये कासले थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बीड पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास कासलेला ताब्यात घेतलं आहे.
Published on: Apr 18, 2025 10:36 AM
