शिक्षकांसाठी महत्वाची बातमी, खासगी शाळेतील शिक्षकांना ग्रॅच्युइटी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी… खासगी शाळेतील शिक्षकांना (Teacher) 1997 पासूनची ग्रॅच्युइटी द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे असंख्य शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे शिक्षकवर्गात आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल 1997 पासून निवृत्त झालेल्या आणि पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या खासगी शाळेतील शिक्षकांना ग्रॅच्युइटीचा हक्क असेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने […]
शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी… खासगी शाळेतील शिक्षकांना (Teacher) 1997 पासूनची ग्रॅच्युइटी द्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे असंख्य शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे शिक्षकवर्गात आनंदाचं वातावरण आहे. एप्रिल 1997 पासून निवृत्त झालेल्या आणि पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या खासगी शाळेतील शिक्षकांना ग्रॅच्युइटीचा हक्क असेल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 2009 मध्ये ग्रॅच्युइटी देयक कायदा, 1972 मध्ये केलेली दुरुस्ती कायम ठेवली आणि खासगी शाळांमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळेल, असा निर्णय दिलाय. त्यामुळे शिक्षावर्गात सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Published on: Sep 03, 2022 10:31 AM
