BEST Election 2024 : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव, भोपळाही फोडला नाही; कोणाचा विजय अन् कोणाला किती जागा?

BEST Election 2024 : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव, भोपळाही फोडला नाही; कोणाचा विजय अन् कोणाला किती जागा?

| Updated on: Aug 20, 2025 | 6:43 PM

बेस्टच्या मतदार निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. शशांकराव यांच्या पॅनलना 14 जागा जिंकल्या तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले.

बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र आले मात्र 21 पैकी शून्य जागा त्यांच्या पदरी पडल्या. ठाकरे बंधूंची एकत्रित पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांपैकी ठाकरे बंधूंच्या पॅनलला चक्क शून्य तर भाजपच्या परिवर्तन पॅनलला 7 आणि शशांकराव यांच्या पॅनलला 14 जागा मिळाल्यात. शशांकराव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकून ही निवडणूक जिंकली आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्याने परिणाम दिसेल असं बोलणाऱ्या राऊतांची मात्र भाषा बदललेली पाहायला मिळाली. दरम्यान, नऊ वर्षानंतर बेस्टच्या निवडणुकीत पैशांमुळे पराभव झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. मात्र शशांकराव यांनी त्याला देखील उत्तर दिले. बघा नेमकं काय म्हणाले?

Published on: Aug 20, 2025 06:43 PM