Raj-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!

Raj-Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वी घडणार दोन मोठ्या घडामोडी!

| Updated on: Jul 13, 2025 | 11:58 AM

Raj-Uddhav Thackeray Reunion : ठाकरे बंधूंच्या युतीच्या आधी 2 मोठ्या बातम्या समोर आल्या आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या आधी 2 मोठ्या बातम्या समोर आल्या आहे. ठाकरे बंधु एकत्र येण्याआधी राज ठाकरेंनी आता राजकीय कवायत सुरू केली आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मनातल्या भावना जाणून घेणार आहेत. इगतपुरीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत 16 जुलैपासून मनसेचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे याची सामनाची मुलाखत देखील 19 आणि 20 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. राज ठाकरेंच्या युतीबाबत या मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

याआधी महाबळेश्वरमध्ये राज ठाकरेंनी कार्यकर्ते, समर्थकांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलन आणि मोर्चे केल्यानंतर विजयी मेळाव्यात दोन्ही ठाकरेंनी एकत्र राहण्याबाबत भाष्य केलं होतं. आता त्यानंतर एकीकडे राज ठाकरेंच शिबिर आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची मुलाखत या दोन्ही मोठ्या घडामोडींकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Published on: Jul 13, 2025 11:58 AM