Madhuri Misal | महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज,  माधुरी मिसाळ यांनी सांगितले नियम

Madhuri Misal | महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, माधुरी मिसाळ यांनी सांगितले नियम

| Updated on: Jan 22, 2026 | 4:18 PM

मुंबईच्या महापौरपदातून एसटीला डावलण्यात आलं आहे. एसटीचं आरक्षण का ठेवलं नाही? एसटीसाठीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांनीही आरक्षण सोडतीवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची लॉटरी फुटताच विरोधकांचा रागही उफाळून आला आहे. आरक्षण सोडतीत चालबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरपदातून एसटीला डावलण्यात आलं आहे. एसटीचं आरक्षण का ठेवलं नाही? एसटीसाठीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. काँग्रेस नेत्यांनीही आरक्षण सोडतीवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यावर आता राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मिसाळ यांनी थेट नियमांवर बोट ठेवतच विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली आहे. आरक्षण सोडत काढल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. पहिले त्यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया कशी करण्यात आली? यावर भाष्य केले. ‘आज आपण 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची सोडत काढली आहे. आरक्षण लोकसंख्येप्रमाणे केली असून ST प्रवर्गासाठी कल्याण-डोंबिवलीत आरक्षण राखीव केले आहे. तीन महानगरपालिकांमध्ये SC आरक्षण ठेवण्यात आले असून, त्यापैकी दोन महापालिकांमध्ये महिला आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आठ आरक्षणांपैकी तीन आधीच्या महापौरांमुळे दिले जाऊ शकले नाहीत, तर उरलेल्या १७ महापालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड आणि भिवंडीतील महिला खुला वर्ग आधीच राखीव असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले आहे. एकूण १५ महापालिकांमध्ये चिठ्ठ्या काढल्या, त्यामध्ये नऊ महापालिकांमध्ये महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. अशाप्रकारे सर्व २९ महानगरपालिकांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.

Published on: Jan 22, 2026 04:18 PM