ती ऑडीओ क्लिप असेल तर..., चंद्रकांत खैरे यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांचं आव्हान
Image Credit source: tv9

‘ ती ऑडीओ क्लिप असेल तर…’, चंद्रकांत खैरे यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांचं आव्हान

| Updated on: Mar 28, 2023 | 9:00 PM

VIDEO | ठाकरे गट आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद चिघळणार ? चंद्रकांत खैरे यांनी काय केला आरोप?

जालना : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. अशातच आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळत असून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाट यांना कॅरेक्टरलेस ठरवून त्यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर ठाकरे गट आणि संजय शिरसाट यांच्यातील वाद चांगलाच चिघळणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय शिरसाट हा स्वतःच कॅरेक्टरलेस माणूस असून माझ्याकडे त्यांच्या विषयीची एका महिलेची क्लिप आहे. ज्यामध्ये तिने शिरसाट यांच्यावर आरोप केल्याचा दावाही चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे. यानंतर आता या टीकेवर काय प्रत्युत्तर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Mar 28, 2023 09:00 PM